जळगांव राजमुद्रा दर्पण | शिवसंपर्क अभियानांतर्गत शिवसेना जळगाव महानगरतर्फे जळगांव शहरात विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. शुक्रवार, दि. २७ मे रोजी महाबळ कॉलनी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांच्या उपस्थितीत ‘ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर किटस्’चे वाटप करण्यात आले.
प्रसंगी युवासेना सहसचिव विराज कावडिया, शिवसेना महिला आघाडी महानगराध्यक्षा शोभाताई चौधरी, शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत,शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, नगरसेवक नितीन बरडे, शिवसेना उपनेते लक्ष्मणजी वडले, गजाननजी चव्हाण, जळगाव शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री सुनिल महाजन यांच्यासह उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेनेचे जळगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख शाम कोगटा, शिवसेना अल्पसंख्यांक आघाडीप्रमुख जाकीर पठाण, शिवसेनेचे नितीन सपके, प्रशांत सुरळकर, शिवराज पाटील, अमित जगताप, स्वप्नील परदेशी, विशाल वाणी आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.