जळगांव राजमुद्रा दर्पण | पहिल्या लॉकडाऊनपासून ते आता पर्यंत सर्वांच्याच परीक्षा ऑनलाइन पद्धतीने झाल्या आहे. लहान विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धती येत नसल्याने आणि कळतही नसल्याने त्यांचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे.
हे नुकसान भरून काढण्यासाठी यावर्षी इयत्ता दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षात जूनमध्ये विद्यार्थ्यांची उजळणी घेऊन त्यानंतर चाचणी घेण्यात येणार आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे गेल्या वर्षांपासून इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे कठीण गेले होते. विद्यार्थी पुढील वर्गात गेले असले तरीही काही विशिष्ट संकल्पना अजूनही त्यांना अस्पष्ट आहे.