लडाख राजमुद्रा दर्पण |लडाख मध्ये झालेल्या बस दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरण आले. खटावचे सुभेदार विजय शिंदे आणि कोल्हापूरचे प्रशांत जाधव यांना वीरमरण आले.
सुभेदार विजय सर्जेराव शिंदे हे १९९८ मध्ये २२ मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये लष्करी सेवेत रुजू झाले होते. 24 वर्षाच्या कालावधीत त्यांनी लष्करात विविध ठिकाणी काम करून देशाचं संरक्षण केलं आहे. तर 27 वर्षीय प्रशांत गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे बुद्रुक इथले रहिवासी आहेत. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच तालुक्यात सर्वत्र शोककळा पसरली. या दोघांच्या हौतात्म्यामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे.
थॉईसपासून सुमारे 25 किमी अंतरावर हा अपघात झाला. लष्कराची बस 50-60 फूट खोलवर श्योक नदीत कोसळली. ज्यामध्ये लष्कराचे सर्व जवान जखमी झाले. सर्व जवानांना परतापूर येथील 403 फील्ड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आणि लेहहून परतापूरला सर्जिकल टीम पाठवण्यात आली. 26 जवानांना घेऊन जाणारी बस नदीत पडून हा अपघात झाल्याचे समजते. या अपघातात लष्कराच्या सात जवानांचा मृत्यू झाला. अनेक जवान जखमी झालेत. अपघातानंतर जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण या दुर्घटनेत 7 जवानांना आपला जीव गमवावा लागला.
जखमी झालेल्या जवानांसाठी हवाई दलाशी संपर्क साधून मदत मिळवण्याचं प्रयत्न केला. हा अपघात कशामुळे झाला हे स्पष्ट झालेले नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार, सैनिकांची बस शिबिरातून सब सेक्टर हनिफच्या पुढे जाण्याच्या दिशेने जात होती, त्याचवेळी हा अपघात झाला.