कोल्हापूर राजमुद्रा दर्पण | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल नागरिकांमध्ये प्रेम आहे.मुख्यमंत्री हे जणू आपल्याच घरातले आहे असे सामान्य जनतेचा समाज झाला आहे. राज्यात विरोधक आहेत. परंतु त्यांना आरोप करणे इतकेच येते.
संजय पवार यांच्यासारख्या शिवसैनिकाला राज्यसभेची उमेदवारी दिली. संभाजी राजे यांना शिवसेनेत येण्याचे आमंत्रण शिवसेना पुरस्कृत उमेदवार याबाबत विचार करू असे म्हटले होते. पण, शिवसेना नेत्यांच्या बैठकीत आम्ही शिवसैनिकाला पाठविण्याचा निर्णय घेतला, असे राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच, यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत बाजूला बसलेल्या संजय पवार यांचा उल्लेख नवनिर्वाचित खासदार असा केला.
छत्रपती शिवाजी महाराज हे कोणाच्या मालकीचे नाहीत. ते संपूर्ण विश्वाचे आहेत. शिवसेना पक्षाचा निर्णय हे आमचे नेते आणि पक्षप्रमुख घेणार. आमच्या पक्षाने काय करवाई, कुणाला उमेदवारी द्यावी याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. त्यावर फडणवीस यांनी बोलू नये. शिवसेनेने काय करावे हे सांगण्यासाठी देवेंद्र फडणवीस शिवसेनेत येणार आहेत का? शिवसेनेने पक्षाचा निर्णय घेतला तरी त्यावर विरोधक टीका करतात. यामध्ये विरोधकाना काय असुरी आनंद मिळतो हे कळत नाही. चंद्रकांत पाटील हे कोणा कोणाचे वंशज आहेत. 2019 साली कोणी शब्द तोडला हे त्यांनी आधी सांगावे. त्यांनी ‘चोंबडेपणा’ करू नये अशी टीका राऊत यांनी केली.