जळगांव राजमुद्रा दर्पण | येत्या जून महिन्यात असे काही बदल होणार आहेत ज्याचा परिणाम तुमच्या खिशावर होताना दिसेल. जून महिन्यात काही महत्वाचे निर्णय घेण्यात येणार आहे.
देशातील सर्वात मोठी बँक SBI ने गृहकर्जासाठी बाह्य बेंचमार्क लेंडिंग रेट वाढवण्यात आला आहे. आता हा बेंचमार्क दर 0.40 टक्क्यांनी वाढून 7.05 टक्के झाला आहे. त्याचप्रमाणे रेपो लिंक्ड लेंडिंग रेट देखील 0.40 टक्क्यांनी वाढून 6.65 टक्के झाला आहे. यापूर्वी हे दोन्ही दर अनुक्रमे ६.६५ टक्के आणि ६.२५ टक्के होते. रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अलीकडील अधिसूचनेनुसार, 1000 सीसी पर्यंत इंजिन क्षमता असलेल्या कारसाठी विमा प्रीमियम 2,094 रुपये असेल. कोविडपूर्वी 2019-20 मध्ये ते 2,072 रुपये होते. त्याच वेळी, 1000cc ते 1500cc कारसाठी विमा प्रीमियम 3,416 रुपये असेल, जो पूर्वी 3,221 रुपये होता. याशिवाय, जर तुमच्या कारचे इंजिन 1500cc पेक्षा जास्त असेल तर आता विमा प्रीमियम 7,890 रुपयांवर येईल. पूर्वी ते 7,897 रुपये होते. सरकारने 3 वर्षांसाठी सिंगल प्रीमियम देखील वाढवला आहे. आता 1000cc पर्यंतच्या कारसाठी 6,521 रुपये, 1500cc पर्यंतच्या कारसाठी 10,540 रुपये आणि 1500cc वरील कारसाठी 24,596 रुपये मोजावे लागतील. एसबीआयच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, वाढलेले व्याजदर १ जूनपासून आमलात आणणार आहे. SBI ने किरकोळ खर्चावर आधारित कर्जदरात 0.10 टक्क्यांनी वाढ केली आहे, जी 15 मे पासून लागू झाली आहे.