जळगाव राजमुद्रा दर्पण | गोलाणी मार्केटमध्ये शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानक मोठा आवाज आला. आणि जमिनीतून आग निघतांना दिसली. जमिनीतून टाकलेल्या वायर जाळली असल्या कारणाने ही आग लागली आणि कालपासून गोलानिमधील लाईट बंद आहेत.
तिथला वीज पुरवठा खंडित झाला आहे. गेल्या महिन्याभरापासून वीज पुरवठा खंडित होण्याचा गोलाणीतील व्यापाऱ्यांना त्रास होतो. मात्र महावितरण याकडे दुर्लक्ष करत असल्याचे समजले आहे. जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमध्ये बहुतांशी मोबाईलची दुकाने आणि विविध क्लासेस आहेत. राज्य शासनाने गेल्या दोन-तीन आठवड्यापासून भारनियमन बंद केल्याचा दावा केला असला तरी गोलाणीच्या बाबतीत ते साफ खोटे आहे. गोलाणी गेल्या महिनाभरापासून कोणत्या ना कोणत्या भागात वीजपुरवठा खंडित होत असून दुकानदार अथवा व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. टाकतात करून देखील काहीही फायदा होत नसल्याचे तिथले दुकानदार सांगत होते.,