जळगांव राजमुद्रा दर्पण | शिक्षा अभियानांतर्गंत १ लाख ५४ हजार ७४४ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळावा यासाठी ९ कोटी २८ लाख ४६ हजार४०० रुपयांच्या निधीला मंजुरी मिळालेली आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याला एक गणवेश जोडीची रक्कम मिळणार असून त्या त्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.जिल्ह्यात ९४५ मुली, ८६०५ अनुसूचित जातीची मुले ३२ हजार ०३१ अनुसूचित जमातीची मुले आणि १९ हजार ५७२ दारिद्रय रेषेखालील पालकांची मुले अशा एकूण १ लाख ५४ हजार ७४४ विद्यार्थ्यांना दोन संच देण्यासाठी प्रति विद्यार्थी ६००रु.याप्रमाणे ९ कोटी २८ लाख ४६ हजार ४०० रुपयांची तरतूद केलेली रक्कम २३ मे रोजी जळगाव जिल्ह्यास प्राप्त झाली असून शाळा व्यवस्थापन समिती स्तरावर उपलब्धतेसाठी २४ मे रोजी पीएफएमएमस अंतर्गत कार्यवाही करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी सांगितले. नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिली ते आठवीच्या मुली, आदिवासी मुले, मुली, मागासवर्गीय मुले, मुली तसेच दारिद्रय रेषेखालील मुले या योजनेचा लाभ घेऊ शकतात. जून महिन्यात शाळा सुरू होत असून, मे महिन्यात गणवेशासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या रकमेतून गणवेश खरेदी करून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी ganveshasah हजार राहणे गरजेचे असणार आहे. अशा सूचना शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी दिल्या आहेत.
समग्र शिक्षा मोफत गणवेश योजना २०२२-२३ या करिता राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या पत्रानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांतील पहिलीमध्ये शिकत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जातीची मुले, अनुसूचित जमातीची मुले, दारिद्र्य रेषाखालील पालकांची मुले यांना योजनेचा लाभ देण्याचे मंजूर करण्यात आले आहे.