जळगांव राजमुद्रा दर्पण | कोविड-19 मुळे जे बालक अनाथ झालेल्या बालकांच्या संरक्षणासाठी ‘पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजना’ जाहीर करण्यात आली आहे.
या योजनेमुळे अशा अनाथ मुलांच्या कल्याणासाठी आणि सर्वोत्कृष्ट हिताच्यादृष्टिने त्यांचे 23 वयवर्षे पूर्ण होईपर्यंत भारत सरकार त्यांचे अंरक्षण करणार आहे. अनाथ बालकांना 30 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध लाभ उपलब्ध करून दिले जाणार आहे.
जळगांव जिल्ह्यातील इतर लाभधारकांसह 27 बालके कार्यक्रमास ऑनलाईन पद्धतीने सहभागी होत आहेत. जिल्ह्यातील विविध लाभधारकांना ऑनलाईन संवाद साधणे सोईचे व्हावे यादृष्टिने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात विशेष तयारी करण्यात आली आहे.