जळगांव राजमुद्रा दर्पण | जिल्यातील नागरिकांच्या अडचणी दूर करण्याच्या हेतूने जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रवींद्र नाना पाटील यांच्या संकल्पनेतून ‘एक काॅल मदतीचा : संवाद आपुलकीचा’ हे अभियान हाती घेऊन त्याचा शुभारंभ खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात येणार असल्याचे रवींद्र पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, जळगाव जिल्ह्याचे निरीक्षक अविनाश आदिक, माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे आदी उपस्थित हाेते.सोमवार ते शुक्रवार सकाळी ११ ते ५ वाजेदरम्यान नागरिकांना ७७५७०७४९८० किंवा ०२५८२ २९९७७३ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येईल. त्यानंतर या अभियानात काम करणारे स्वयंसेवक या समस्यांसंदर्भात संबंधित विभागांशी संपर्क साधून ते काम पूर्ण करण्यासाठी अथवा समस्या निराकरणासाठी मदत व सहकार्य करतील.