मुंबई राजमुद्रा दर्पण | पाऊसाची वाट बघणे आता संपले आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून मान्सूनने एन्ट्री केल्यामुळें अंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा वेळेआधी मान्सूनचं केरळमध्ये आगमन झालं आहे. शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
हवामान विभागाकडून मान्सूनबाबत सर्वात मोठी माहिती मिळाली आहे. यंदा पाऊस चांगला होईल असंही हवामान विभागाने काही दिवसांपूर्वी अंदाज वर्तवला होता. मान्यून वेळेआधी दाखल झाल्याने शेतकरीही सुखावला आहे.
1 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र 29 मे रोजीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. उद्यापासून राज्यात काही भागात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी होण्याचा इशारा देण्यात आला.
उद्यापासून सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाच्या प्रामुख्याने दक्षिण भागात तुरळक ठिकाणी ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे.