जळगांव राजमुद्रा दर्पण | पर्यावरण सौरक्षण आणि इंधन बचत अनुषंगाने महामंडळाच्या जळगाव विभागातून शिघ्रतेने ५० इलेक्ट्रिक एसटी बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 जून का या बस सेवेचा श्री गणेशा होणार असल्याचे समजते.
p2परिवहन दिनानिमित्ताने १ जूनपासून पुणे-नगर बसने पुण्यातून या इलेक्ट्रिक बसचा शुभारंभ होताे आहे. जळगाव विभागाने ५० बस मिळण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. जळगाव विभागातून इलेक्ट्रिक बस कधीपर्यंत धावणार याबाबत मंडळ लवकरच निर्णय घेईल.महाराष्ट्रातील इतर विभागांप्रमाणे या बसेसचा ताफा लवकरच दाखल हाेणार असल्याचे सांगण्यात येते आहे.
इलेक्ट्रिक बससाठी जळगावात मेन चार्जिंग पॉइंट राहणार आहे. जामनेर, पाचोरा, चोपडा या ठिकाणी चार्जिंगच सब पॉइंट काढण्याचे नियोजन आहे. या इलेक्ट्रिक बसला २०० किलोमीटरसाठी दोन तास चार्जिंग अपेक्षित आहे .
या इलेक्ट्रिक बसला साध्या गाडीचे जेवढे भाडे आहे तितकेच आकारण्यात येणार असल्याचे समजते. त्यात प्रतिटप्पा ८ रुपये ७० पैसे दर आकारण्यात येणार आहे.