जळगाव राजमुद्रा दर्पण | एका केमिकल कंपनीच्या शेअर्सने घसघशीत परतावा दिला आहे. मल्टीबॅगर परतावा देणारी ही कंपनी ‘भारत रसायन’ आहे.गेल्या काही वर्षांत कंपनीचे शेअर्स 25 रुपयांवरून 11,000 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना चक्क 35,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 15,100 रुपये आहे. त्याच वेळी, भारत रसायनाची 52 आठवड्यांची निचांक पातळी 9,482.75 रुपये होती.
1 लाख रुपयाचे 4.5 कोटींहून अधिक पैसे झाले :-
30 जुलै 2004 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर रासायनिक कंपनी भारत रसायनचे शेअर्स 24.10 रुपयांच्या पातळीवर होते. 27 मे 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 11,600 रुपयांवर बंद झाले. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 35,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 30 जुलै 2004 रोजी भारत रसायनाच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या ही रक्कम 4.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली असती.
10 वर्षात 1 लखाचे तब्बल 78 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले :-
25 मे 2012 रोजी भारत रसायनाचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 140.50 रुपयांच्या पातळीवर होते. 27 मे 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 11,600 रुपयांवर बंद झाले, जर एखाद्या व्यक्तीने 25 मे 2012 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे 78.59 लाख रुपये झाले असते. भारत रसायनाच्या शेअर्सनी गेल्या 5 वर्षांत गुंतवणूकदारांना 314 टक्के परतावा दिला आहे.
डिसेंबर 2021 च्या तिमाहीत भारत रसायन कंपनीचा एकत्रित निव्वळ नफ्यात 30.64% वाढ झाली होती..
अस्वीकरन :- या ठिकाणी केवळ शेअर्स बद्दल माहिती दिली आहे,शेअर बाजारात गुंतवणूक करने धोक्याच्या अधीन आहे तरी कृपया कोणताही गुंतवणुकीच्या निर्णय घेण्यापूर्वी प्रामाणिक तज्ञांचा सल्ला घ्या..