रावेर(प्रतिनिधी) :-रावेर परीसरात चोरट्यांचा धुमाकुळ सुरुच आहे.उटखेडा,रमजीपुर,नंतर चोरट्यांनी आपला मोर्चा अहीरवाडीकडे वळविला असून अमावस्याच्या रात्री घर फोडुन सुमारे ७ लाखाच्या वर ऐवज चोरुन नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहे.
या बाबत वृत्त असे की अमावस्याच्या रात्री अज्ञात चोरट्यांच्या टोळीने अहीरवाडी (ता रावेर) बाहीरपूरा भागात रहीवासी असलेले रमेश शामराव महाजन यांच्या घरामध्ये खिडकी तोडून अनअधिकृत पणे प्रवेश केला.व घरात असलेले सुमारे एक लाखाच्या वर रोख रक्कम तर सुमारे दहा तोळ्याच्या वर सोन्याचे दागीणे चोरुन नेले आहे.यामुळे गावात एकच खळबळ उडाली असुन पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे.