जळगाव राजमुद्रा दर्पण | टाईम्स नाऊ या इंग्रजी चॅनेलवर ज्ञानवापी फाइल्स हा चर्चेचा कार्यक्रम चालू असताना त्या कार्यक्रमात उपस्थित दिल्ली येथील भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या श्रीमती नपुर शर्मा यांनी इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद(स) यांच्या व त्यांची पत्नी हजरत आयशा यांच्या बद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधाने करून सर्व मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या तसेच दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून जळगाव जिल्हा मनियार बिरादरी चे अध्यक्ष फारुक शेख यांनी श्रीमती नपुर शर्मा यांच्या विरोधात भादवि २९५(अ),१५३(अ) ५०५(२) अन्वये कायदेशीर कारवाई करण्याकरिता पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन पोलीस अधीक्षकांचे प्रतिनिधी गृह विभागाचे पोलीस उपअधीक्षक माननीय संदीप गावित यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना लेखी तक्रार व या चर्चेचा व्हिडिओ पेन ड्राईव्ह म्हणून पुराव्या कामी सादर केलेला आहे.
सदर प्रकरणी माननीय पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलीस उपअधीक्षक गृह संदीप गावित यांनी शिष्टमंडळास दिले.
शिष्टमंडळात यांचा होता समावेश –
एम आय एम चे उत्तर महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सनेर सय्यद, जामा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष सय्यद चाँद अमीर, मुस्लिम ईदगाह ट्रस्ट चे अनीस शहा अय्यूब शाह,कुरेशी बिरादरीचे याकूब खान मकबूल खान व उस्मानिया पार्क चे सामाजिक कार्यकर्ते समीर रईस शेख यांचा शिष्टमंडळात समावेश होता.