लॉरेन्स बिश्नोई टोळी आणि कॅनडाचा गँगस्टर गोल्डी ब्रार यांनी या हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचे पोलिसांनी सांगितले होते. मात्र, या शोध मोहिमेबाबत तुरुंगातील वरिष्ठ अधिकाऱ्याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमागे बिश्नोईचा हात असल्याच्या माहिती मिळाल्यानंतर तिहाड तुरुंगात शोधमोहीम सुरू आहे. पोलीस प्रशासनाने दिल्लीतील तिहाड तुरुंगातील कैदी लॉरेन्स बिश्नोईच्या सेलची झडती घेतल्याचे सांगितले जात आहे. मुसेवाला रविवारी संध्याकाळी 5.30 च्या सुमारास त्यांच्या चुलत भाऊ आणि मित्रासह पंजाबमधील जवाहरके गावात जात असताना बंदुकधारींनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती.
शोध पथकाला काही प्रतिबंधित वस्तू सापडल्या :-
पंजाब पोलिसांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, लॉरेन्स बिश्नोई गँग आणि कॅनडाचा गँगस्टर गोल्डी ब्रार यांनी या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र, या शोध मोहिमेबाबत तुरुंगातील वरिष्ठ अधिकाऱ्याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु एका मध्यम-स्तरीय अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, “कारागृह 8 मधील बिश्नोईच्या उच्च-जोखीम कक्षात झडती घेण्यात आली. व त्यांनतर शोध पथकाला काही प्रतिबंधित वस्तू सापडल्या.”
बिष्णोई यांच्या सेल मधून फोन सापडला कि काही अजून ? :-
बिश्नोईच्या सेलवर आढळलेली प्रतिबंधित वस्तू सेल फोन आहे की आणखी काही आहे याची HT स्वतंत्रपणे पुष्टी करू शकले नाही. दरम्यान, पंजाब पोलीस तिहाडमध्ये जाऊन बिश्नोईला ताब्यात घेण्याची शक्यता असल्याचेही तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले. कारागृह विभागाला पंजाबकडून अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. बिश्नोई हा त्याचा कॅनडास्थित सहकारी गोल्डी ब्रारच्या संपर्कात कसा होता आणि कारागृहातून हत्येची योजना कशी आखत होता, याचा तपास पोलिस करणार आहेत.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सोमवारी HTला सांगितले की, पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येचा कट राष्ट्रीय राजधानीतील तिहाड तुरुंगाशी संबंधित असल्याची काही महत्त्वाची माहिती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने गोळा केली आहे. दिल्ली पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तिहार तुरुंगातून एक फोन नंबर ट्रेस करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी मोहम्मद शाहरुख या गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली होती. तो कॅनेडियन गँगस्टर गोल्डी ब्रारशी बोलण्यासाठी मेसेजिंग अॅप वापरत होता.
कोण आहे लॉरेन्स बिश्नोई ? :-
उत्तर भारतातील टॉप गुंडांपैकी एक असलेल्या लॉरेन्स बिश्नोईवर दिल्ली, राजस्थान आणि पंजाबमध्ये गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खून, दरोडा, खंडणी आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. बिश्नोईचा जवळचा सहकारी संपत नेहरा याला अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याबद्दल 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. बिश्नोईच्या जवळच्या साथीदारांपैकी एक दिल्लीचा गुंड कला जाठेदी देखील आहे. गेल्या वर्षी अटक होईपर्यंत जठेदी हा दिल्लीतील मोस्ट वॉन्टेड व्यक्ती होता.