जळगांव राजमुद्रा दर्पण | कोविड-19 मुळे पालक अथवा दत्तक पालक यांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांच्या संरक्षणासाठी ‘पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन या योजना केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण विकास मंत्रालयातर्फ़े सुरू करण्यात आल्या. जिल्हाधिकारी यांनी यावेळी बालकांना आम्ही तुमच्या सोबत आहोत असा धीर देत चांगला अभ्यास करा आणि उत्तम करिअर करा, असा सल्ला दिला.
दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज जळगावातील 27 बालकांशी जिल्हाधिकारी कार्यालयातील कॉन्फरन्स कक्षातून संवाद साधला. यावेळी दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी उपस्थित असून जळगांव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, उपजिल्हाधिकारी प्रसाद मते, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत उपस्थित होत्या. तसेच cdpo विजयसिंग परदेशी, राजेंद्र पाटील, एस आर पाटील, सारिका मेतकर योगेश मुक्कावार, जयश्री पाटील, ज्ञानेश्वर पवार, प्रल्हाद पाटील, वैशाली पाटील, आकाश मराठे, गायत्री अकोलकर, संभाजी राठोड, चेतन पाटील, पवन राठोड, कोमल तायडे तसेच जिल्हा महिला बाल विकास अधिकारी व जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या योजनेअंतर्गत अनाथ मुलांच्या कल्याणासाठी हिताच्या दृष्टीने त्यांचे 23 वय वर्षे पूर्ण होई पर्यंत भारत सरकार संरक्षण करणार आहे. अशा बालकांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 18 वय वर्ष पूर्ण झाल्यावर 10 लाख रुपयांचा लाभ आणि आयुष्यान भारत योजनेंतर्गत 5 लाखांचा विमा संरक्षण देण्यात आले तर जळगावातील 27 बालकांना शैक्षणिक साहित्य देखील देण्यात आले. जळगांव जिल्ह्यातील 27 लाभीर्थी पैकी 25 बालके व त्यांचे नातलग व सांभाळकर्ते जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे उपस्थित होते व त्यांनी सदर ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी झाले होते.
पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेंतर्गत कोरोनामुळे पालक गमावलेल्या देशभरातील अनाथ बालकांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत बालकांना महत्वाच्या कागदपत्रांचे वाटप करण्यात आले व आरोग्य विमा कार्ड, टपाल खात्यात ठेवलेल्या रकमेचे पासबुक आणि पंतप्रधानांचे पत्र अशा साहित्याचे वाटप करण्यात आले.
कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या 27 बालकांना आरोग्य विमा हेल्थ कार्ड, पोस्ट खात्यात ठेवलेल्या रकमेचे पासबुक आणि पंतप्रधानांचे पत्र व मा. पंतप्रधान यांचे स्नेह पत्र अशा साहित्याचे वाटप करण्यात आले. उर्वरित बालकांच्या सांभाळकर्त्यांना या साहित्याचे वाटप करण्यात आले.