जामनेर राजमुद्रा दर्पण |अवैधरीत्या गुटखा, पानमसाला, तंबाखू घेवून जाणार कंटेनर जामनेर पोलिसांनी तालुक्यातील नेरी ते जळगाव रस्त्यावर पकडला. यात सुमारे ७ लाख ४८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रुक ते नेरी टोल नाका दरम्यान कंटेनर (एमएच २० ईएल ७५५२) या क्रमांकाची वाहनातून बेकायदेशीररित्या गुटखा, पानमसाला, तंबाखू घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सोमवारी ३० मे रोजी सकाळी ६.३० वाजता पथकासह धडक कारवाई करत सुमारे ७ लाख ४८ हजार ८०० रुपये किमतीचा गुटख्यासह सामान आणि ८ लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण १५ लाख ४८ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोहेकॉ तुषार पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सोहेल जाफर शेख (वय-२१) आणि सचिन शंकर बनकर (वय-२६) दोन्ही रा. बालाजी नगर, औरंगाबाद या दोघांना ताब्यात घेतले आहे.
जामनेर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे जामनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलीस उपनिरीक्षक किरण शिंदे या कारवाईचा पुढील तपास करीत आहे.