जळगांव राजमुद्रा दर्पण | फाली औद्योगिक जगतातील नायकांना एकत्रित आणून शेतकऱ्याच्या पुढील पिढीला चालना देण्यासाठी प्रयत्न करत आहे.
जैन हिल्स येथे फालीचे आठवे संम्मेलन आयोजित करण्यात आलेले आहे. हे संम्मेलन १ , २ तसेच ४ , ५ जून या दिवशी दोन भागात घेतले जाईल. या संम्मेलनासाठी महाराष्ट्र व गुजरात राज्यातील १३५ शाळांमधील ११ हजार विद्यार्थ्यांमधून ८०० विद्यार्थी निवडण्यात आले आहे. फालीच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे २५ हजारहून अधिक विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले आहे.
आधुनिक शेती, कृषी व्यवसाय तसेच ग्रामीण विकास ह्या क्षेत्रात कार्यरत असलेले त्यासोबत उच्च शिक्षण घेणाऱ्या सहा फालीच्या माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती असणार आहे. फाली शाळांमधील संवादात्मक शिक्षण, प्रात्यक्षिके, क्षेत्रभेटी, वेबिनार, बिझनेस प्लॅन आणि इन्होवेशन स्पर्धा या सर्वांसाठी जबाबदार असलेले ७० हून अधिक ए. ई. (अॅग्रिकल्चर एज्युकेटर) जे बी.एस्सी आणि एम.एस्सी कृषि पदविधर आहेत..भविष्यात फालीला प्रायोजित करू शकणाऱ्या कंपन्यांमध्ये टाटा रॅलीज, महिंद्रा, आइटीसी, अमूल आणि दीपक फर्टिलायझर यांचा समावेश आहे.