पुणे राजमुद्रा दर्पण | राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अज्ञात तरुणाने जीवे मारण्याची धमकी दिली. या तरुणाला सिंहगड रस्ता पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.
भाऊसाहेब नारायण शिंदे ( रा. भेंडा, तालुका नेवासे, जिल्हा अहमदनगर) असे या आरोपी तरुणाचे नाव असून आज त्याला न्यायालयात हजर करणार आहे.
भाऊसाहेब नारायण शिंदे याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधक्ष्य रुपाली चाकणकर यांना धमकीचा फोन आल्यानंतर त्यांचे बंधू संतोष बोराटे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.