मुंबई राजमुद्रा दर्पण | देशात एक नवीनच खळबळ सुरू आहे. ड ईडीने सर्वत्र धुमाकूळ माजवला आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी व राहुल गांधी यांना ईडी कडून नोटीस आली. यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडालेली आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे नेते सध्या ईडीच्या रडारवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना काही दिवसांपूर्वीच ईडीने नोटीस पाठवली. त्यानंतर पत्नी मंदाताई खडसे यांना देखील चौकशीला सामोरे जावे लागले होते तर खडसेंचे जावई यांना ईडीने अटक केली होती. आता एक मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथराव खडसेंसह चौघांना ईडीने नोटीस बजावली. पीएमएलए अंतर्गत जप्त केलेल्या ११ मालमत्ता रिकाम्या करण्याची ही नोटीस असल्याचे समजते. भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या कुटुंबामागे ईडीचा ससेमिरा लागला होता. ईडीने त्यात त्यांची चौकशी देखील केली असून नोटीस देखील बजावली होती. दरम्यान, ईडीने पुन्हा एकनाथराव खडसेंसह चौघांना नोटीस बजावली आहे.
एकूण अकरा मालमत्ता बाबत ईडीची नोटीस आहे. त्यात मुंबई, नाशिक, पुणे, जळगाव, लोणावळा, सूरत येथील फ्लॅट्स, बंगले, भूखंड, जमिनी आदी मालमत्तांचा समावेश आहे. खडसेंसह त्यांच्या पत्नी मंदाकिनी, गिरीश चौधरी, इन्शिया मुर्ताझा बादलावाला, उकानी हे सर्व य मालमत्तेचे मालक आहेत.,