मुंबई राजमुद्रा दर्पण | एका मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केलेल्या प्रकरणात दिंडोशी सत्र न्यायालयाने अति महत्वाचा निर्णय घेतला. न्यायालयाने आरोपीस फाशीची शिक्षा सुनावली आहे.
मुंबईतील साकीनाका परिसरात 10 सप्टेंबर 2021 च्या काळरात्री ही घटना घडली होती. नराधमाने एका मुलीवर बलात्कार करून तिची घ्रून हत्या केली होती. संपूर्ण घटना घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. नराधम मोहन चौहान याने ‘त्या’ मुलीची हत्या करून तिला जखमी अवस्थेत तिला तसेच सोडले होते. त्या मुलीला जखमी अवस्थेत राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही 11 सप्टेंबर रोजी पीडितेने आपले प्राण सोडले होते. पोलिसांनी मिळालेल्या पुराव्याच्या आधारे अवघ्या काही तासातच नराधम मोहन चौहान याला अटक केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास जलदगतीने करत आरोपीविरोधात सर्व पुरावे गोळा केले.
पोलिसांनी सादर केलेल्या पुरावाच्या आधारे दिंडोशी सत्र न्यायालयाने आरोपी मोहन चौहान याला बलात्कार आणि हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली.