गुजरात राजमुद्रा दर्पण | प्रत्येक जण आपल्या लग्नाची खूप आतुरतेने वाट पाहत असतो तो दिवस त्याच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा असतो. यासाठी ते खूप आधीपासून तयारी करतात. गुजरातमधून अशाच एका विचित्र लग्नाची गोष्ट समोर येत आहे.
एक २४ वर्षांची तरुणी स्वतःसोबतच लग्नाची गाठ बंधी इच्छिते. इतकंच नव्हे तर, लग्नानंतर ती हनीमूनसाठीही जाणार आहे. या निराळ्या लग्नाची सध्या सर्विकडे जोरदार चर्चा सुरू आहे. क्षमा बिंदू असे तरुणीचे नाव आहे.
गुजरातमधील वडोदरा येथे राहणारी २४ वर्षीय क्षमा बिंदूही तिच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त असून 11 जून रोजी तिचे लग्न आहे. तिने लेहेंग्यापासून पार्लर, ज्वेलरी, फोटोग्राफरपर्यंत सर्व काही बुक केले आहे. पण खास गोष्ट म्हणजे तिच्याशी लग्न करण्यासाठी कोणीही वर नसेल. तुम्हाला हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल की वर नसलेले लग्न कसे? खरतर क्षमाने सोलो वेडिंग म्हणजेच स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नानंतर क्षमाही हनिमूनला जाणार आहे. ती दोन आठवड्यांसाठी गोव्याला हनिमूनला जाणार आहे. जेव्हा तिने स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय तिच्या पालकांना सांगितला तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला. मात्र समजूत काढल्यानंतर पालकांकडून क्षणाला लग्नासाठी परवानगी मिळाली. या लग्नासाठी त्याच्या आई-वडिलांनी तिला पाठिंबा आणि आशीर्वाद दिला आहे.