मुंबई राजमुद्रा दर्पण | केंद्रीय गृह मंत्रालयाने वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया जाहिर केली आहे. सहाय्यक संपर्क अधिकारी सहाय्यक लेखापाल आणि कनिष्ठ हिंदी अनुवादक अशा विविध पदांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी जाहिरात वाजून दिलेल्या नमुन्यांमध्ये आणि निश्चित वेळेत आपले अर्ज जमा करावे. गृहमंत्रालयाने नव्या भरती संदर्भात काढलेल्या अधिसूचनेनुसार, उमेदवार परिपत्रक जारी झाल्यापासून 60 दिवसांच्या आत विहित नमुन्यानुसार रिक्त पदांसाठी अर्ज करु शकतात.उमेदवाराचे वय हे 56 वर्षांपेक्षा अधिक नसावे. उमेदवारांनी ध्यानात घ्यावे की त्यांचे वेतन हे मासिक वेतनश्रेणीच्या रुपये 35,400 ते 1,12,400 रुपयांच्या आसपास असेल. या नियुक्त्या या प्रतिनियुक्तीच्या तत्वावर असतील. ज्याचा कार्यकाळ तीन वर्षा इतकाच असेल. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटला नियमित भेट द्यावी असा संदेश इच्छुक उमेदवारांना देण्यात आला आहे.