टाटा गृपच्या एका कंपनीने जबरदस्त परतावा दिला आहे. ती म्हणजे “टायटन” कंपनी. टायटन कंपनीचे शेअर्स गेल्या काही वर्षांत 2 रुपयांवरून 2200 रुपयांपर्यंत वाढले आहेत.शेअर मार्केट मधील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचाही टायटन कंपनीत मोठा हिस्सा आहे. कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 2768 रुपये आहे.
1 लाखाचे 11 कोटी रुपये झाले :-
23 नोव्हेंबर 2001 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर टायटन कंपनीचे शेअर्स फक्त 2.02 रुपयांवर होते. आणि आता टायटनचे शेअर्स 2 जून 2022 रोजी रु. 2220 च्या पातळीवर व्यवहार करत आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 100000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 23 नोव्हेंबर 2001 मध्ये टायटनच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या च्या काळात ही रक्कम 11 कोटी रुपयांच्या जवळपास गेली असती.
10 वर्षात 1 लाखाचे 10 लाखांहून अधिक झाले :-
1 जून 2012 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 221.55 रुपयांच्या पातळीवर होते. आणि आज म्हणजेच 2 जून 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 2220 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहेत. जर एखाद्या व्यक्तीने 10 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर हे पैसे 10 लाखांपेक्षा जास्त झाले असते. टायटनच्या शेअर्सनी गेल्या 5 वर्षांत गुंतवणूकदारांना 350 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. त्याचवेळी, गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना सुमारे 40 टक्के परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 1564.60 रुपये होती.
अस्वीकरन :- या ठिकाणी केवळ शेअर्स बद्दल माहिती दिली आहे,शेअर बाजारात गुंतवणूक करने धोक्याच्या अधीन आहे तरी कृपया कोणताही गुंतवणुकीच्या निर्णय घेण्यापूर्वी प्रामाणिक तज्ञांचा सल्ला घ्या.