मुंबई राजमुद्रा दर्पण | उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत एलपीजी गॅस कनेक्शन देण्यात येणाऱ्या नऊ कोटी लाभार्थ्यांना सरकार एलपीजी सबसिडी देत असून, इतर लाभार्थ्यांना बाजारभावाने एलपीजी सिलिंडर घ्यावे लागतील.
पेट्रोलियम सचिव पंकज जैन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, जून 2020 पासून एलपीजीवर कोणतेही अनुदान दिले जात नाही. 21 मे रोजीच, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याची घोषणाही केली. सीतारामन यांनी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षभरासाठी 12 गॅस सिलिंडरवर प्रति सिलेंडर 200 रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली.
सध्या 14.2 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 1,003 रुपये आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सिलिंडरचे बुकिंग झाल्यानंतर सरकार 200 रुपये सबसिडी पाठवणार आहे. उज्वला योजनेच्या 9 कोटी लाभार्थ्यांना सिलिंडरची किंमत 803 रुपये असेल. आणि इतर 21 कोटीहून अधिक गॅस सिलेंडर कनेक्शन असणाऱ्यांना एलपीजी गॅस कनेक्शन बाजारभावाप्रमाणे मिळणार आहे.