मुंबई राजमुद्रा दर्पण | संगीतातला आणखीन एक आवाज गेला. लोकप्रिय गायक केके यांच्या दुःखद निधनानंतर संगीत विश्वाला मोठा धक्का बसला आहे. सर्वत्र शोककळा पसरली आहे. हे दुःख निवारण नाही तोवरच समोर आणखीन एक दुःखद बातमी समोर आली आहे.
गुरुवारी केके यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. आणि त्यानंतर आणखी एका कलाकाराने सांगितलं विश्र्वतून एक्झिट घेतल्याचे समोर येताच पुन्हा कलाजगत खचले. संतूर वादक आणि शिक्षक पंडित भजन सोपोरी यांनी गुरुवारी देह त्यागला. गेल्या बऱ्याच काळापासून गुरुग्राम येथील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण, गुरुवारी मात्र त्यांची आजारपणाशी असणारी झुंज थांबली. सोपोरी यांच्यासारखे व्यक्तीमत्त्व कलाविश्वातून निघून जाणे ही एक मोठी हानी असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली.
वयाच्या 74 व्या वर्षी सोपोरी यांनी जगाचा निरोप घेतला. पंडितजी, सोपोरी सामापा (सोपोरी अकॅडमी ऑफ म्युझिक एंड परफार्मिंग आर्ट्स) चालवत होते. या अकॅडमीचे महत्व म्हणजे देशभरातील विद्यार्थ्यांशिवाय ही अकॅडमी कारागृहातील कैद्यांनाही शिक्षण देत होती. 2011 मध्ये या अकॅडमीला जम्मू काश्मीर डोगरी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. सोपोरी यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. जेव्हा एखादी व्यक्ती कलेशी जोडली जाते तेव्हा त्यांची विचार करण्याची क्षमता रचनात्मक होऊन भविष्याच्या योग्य वाटेवर त्यांचा प्रवास सुरु होतो असे सोपोरी यांचे म्हणणे होते.