वॉशिंग्टन राजमुद्रा दर्पण | चिंतेचा विषय पुन्हा सुरू झाला आहे. जगात पुन्हा कोरोनाने डोके वर काढायला सुरुवात केली आहे. आता लहान मुलांसाठी कोरोना लसीकरण करण्यात येणार असून, 5 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या लसीकरणाची तयारी करण्यात येत आहे. 21 जूनपासून अमेरिकेत लहान मुलांसाठी लसीकरण प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे.
कोरोणा संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व देश लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर देत आहे. आता अमेरिकेत 5 वर्षापर्यंतच्या मुलांना लसीकरण करण्याची योजना आखली जात आहे.
अमेरिकेच्या व्हाईट हाऊसचे समन्वयक आशिष झा यांनी सांगितले की, अन्न व औषध प्रशासनाच्या सल्लागार समितीने 14-15 जून रोजी लहान मुलांसाठी फायझर आणि मॉडर्नाच्या डोसला मान्यता दिली. एफडीएकडून मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच रुग्णालये आणि बालरोग उपचार केंद्रांमध्ये लसीचा पुरवठा सुरू करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
आशिष झा म्हणाले की, फेडरल एफडीएने या दोन औषधांना अपेक्षेप्रमाणे मान्यता दिल्यास 21 जूनपासून बालकांचे लसीकरण सुरू होईल. याअंतर्गत 5 वर्षांपर्यंतच्या मुलांना कोरोनापासून वाचवण्यासाठी लस दिली जाईल. जगात अशा लहान मुलांसाठी अद्याप कोणतीही लस तयार केलेली नाही. अशा स्थितीत या बालकांचे लसीकरण अमेरिकेत सुरु झाले, तर उर्वरित जगात त्याचा परिणाम होईल.
अजून पर्यंत जगात कोरोना प्रादुर्भावाचा तीन लाटा येऊन गेल्या. या तिन्ही लाटांमध्ये कोरोनामुळे लाखो लोकांनी आपला जीव गमावला. मृतांमध्ये सर्व वयोगटातील लोकांचा समावेश आहे. वयोवृद्ध लोकांसाठी, कोरोना लसीकरणाचे काम जगभरात वेगाने सुरु आहे,