जामनेर राजमुद्रा दर्पण | शेतकऱ्यांच्या मुलाने न्यूराेलाॅजी परीक्षेत देशातून पहिला क्रमांक मिळवला आहे. त्याला गोल्ड मेडल मिळाले आहे. शेतकऱ्याचा मुलगा मुळात डॉक्टर आहे. त्याच नाव डॉ. गोपाल घोलप…
जामनेर तालुक्यातील पहूर ग्रामीण भागात राहून त्याच ठिकाणी शिक्षण घेणारा विद्यार्थी परिस्थितीची कोणतीही तमा न बाळगता चापळतेने , हुशारीने आपल्या छोट्याश्या गावाचे नाव देशपातळीवर उंचावतो, हे कार्य खूप कौतुकास्पद आहे, त्याचा सार्थ अभिमान आज पहूरकरांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. सध्या डाॅ. घाेलप मुंबईत बिना टाक्याच्या मेंदूच्या शस्त्रक्रिया या विषयाचा अभ्यास करत असून, यशाचे श्रेय त्यांनी आई-वडील, अंबानी हॉस्पिटलमधील न्यूरॉलॉजी विभागातील सर्व शिक्षक, मित्र व पहूर येथील घोलप परिवराला दिले. डॉ. घोलप यांची पत्नी डॉ. आसावरी घोलप (एम.डी. पॅथॉलॉजी) या न्यूरो पॅथॉलॉजीचे मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत आहे. लहान भाऊ डॉ. सिद्धांत घोलप (एम. डी. बालरोग तज्ज्ञ) असून सदयस्थितित ते मुंबई येथे लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात शिक्षण घेत असून, भाऊ डॉ. अमोल घोलप शेंदुर्णी येथे लहान मुलांचा रुग्णालयात सेवा देत आहे. डॉ. गोपाल घोलप यांचा पहूर येथे एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पहूर पेठ जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलमधून त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण करून दहावी व बारावी परीक्षेतही त्यांनी भरभरून यश मिळवले. यानंतर वडील अरुण घोलप यांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास उराशी बाळगून असलेल्या डॉ. गोपाल घाेलप यांनी नीट परीक्षेची तयारी सुरु केली.
पहिल्या प्रयत्नात पाहिजे ते वैद्यकीय महाविद्यालय न मिळाल्याने त्यांनी सन २००७ मध्ये एन. टी. प्रवर्गातून राज्यात १३वा क्रमांक प्राप्त करून एमबीबीएसचे मुंबईच्या के. ई. एम. काॅलेजात शिक्षण पूर्ण केले. आणि आता नुरोलॉजी परीक्षेत देशातून पाहिले आहे. आपल्या देशासाठी हा अतिशय अभिमानाचा क्षण आहे