जळगांव राजमुद्रा दर्पण | दगडाने ठेचून तरुणाला ठार केले. शहरातील कसमवडी परिसरात असलेल्या मैदानावर गुतुत्वरी रात्री सागर वासुदेव पाटील या तरुणाला दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली. सागर हा एका खुनाच्या गुन्ह्यात संशयित असल्याचे समोर आले आहे. पोलिसांना दोन संशयितांची नावे समोर आली असून पोलिस अधिक तपास करत आहे.
ईश्वर कॉलनी परिसरात सागर वासुदेव पाटील हा तरुण कुटुंबियांसह राहत होता. मिळेल ते काम करीत होता. गुरुवारी रात्री तो नेहमीप्रमाणे घरी आला. कुटुंबियांशी गप्पा केल्यानंतर रात्री १ वाजेच्या सुमारास त्याला कुणीतरी बोलवायला आल्याने तो घराबाहेर पडला. सागरला दारूचे व्यसन असल्याने तो कासमवाडीतील मैदानावरच रात्री बसत होता. मैदानावर रात्रीच्या वेळी बरेच गुंड आणि टवाळखोर तरुण बसलेले असतात. परिसरातील नागरिकांनी देखील याबाबत अनेक वेळा तक्रार दिली आहे.मैदानावर बसलेला असताना सागर पाटील याचा कुणीतरी दगडाने ठेचून त्याची हत्त्या केली. शुक्रवारी सकाळी पहाटेच्या सुमारास घडलेला प्रकार लक्षात आला.
अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या सोबत पथक घटनास्थळी हजर झाले होते. खून का आणि कोणी केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिस अधिक तपास करत असून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला आहे.