नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण | काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीं यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते आहे. गुजरातचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकूर यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून सोनिया गांधी यांना कोरोनची लागण झाली असल्याचे सांगितले आहे.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना बुधवारीच ईडीकडुन नोटीस पाठवण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच आरंभ झालेल्या काँग्रेस चिंतन शिबिरात सोनिया गांधी सहभागी देखिल झाल्या होत्या. शिबिरामध्ये काँग्रेसचे देशभरातील नेते आणि पदाधिकाऱ्यांचा देखिल सहभाग होता. मागील काही दिवसात जो कोणी संपर्कात आला असेल त्याने कृपया करून कोरोना चाचणी करून घ्या असे सोनिया घांधी यांनी सांगितले आहे
सोनिया गांधींना काल संध्याकाळी अर्थात बुधवारी सौम्य ताप आला होता. कोरोनाची लक्षणे दिसत असल्याचं लक्षात येताच त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. चाचणीचा अहवाल प्राप्त झाला असून चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सोनिया गांधींना विलगीकरणात ठेवण्यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही केली जात असून उपचार सुरु करण्यात आले आहे. तसेच ताप आल्यानंतर सोनिया गांधी तातडीने लखनौहून दिल्लीत परतल्या असल्याचे सांगितले जात आहे.देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असून प्रशासनाने काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
ईडीने पाठवलेल्या नोटीसला उत्तर देण्यासाठी त्या चौकशीला जाणार होत्या परंतु कोरोनाची लागण झाल्याने चौकशी होणार कि नाही? याबाबत अजून कोणताही निर्णय समोर आला नाही.,