मुंबई राजमुद्रा दर्पण | राज्यसभेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असून, दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेणे याबाबत अतिशय वेगवेगळ्या घडामोडी राजकारणात पाहायला मिळत आहे.
भाजपने या निवडणुकीत तीन उमेदवार मैदानात उतरवले आहे. तर, शिवसेनेने दोन उमेदवार दिले आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या संख्याबळानुसार त्यांचे प्रत्येकी एक उमेदवार सहजरीत्या निवडून येण्याची शक्यता दिसते आहे.
जर निवडणुक झाली तर त्यामध्ये घोडेबाजी होईल, यामुळे आघाडीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तिसरा उमेदवार मागे घ्या असा प्रस्ताव समोर ठेवला. त्यावर भाजपने विधान परिषदेची एक जागा देऊन त्याबदल्यात राज्यसभेची एक जागा द्यावी असा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर महाविकास आघाडीतील मित्र पक्षांसाठी शिवसेनेने नवा प्रस्ताव ठेवल्याची माहिती हाती आली आहे. शिवसेनेने राज्यसभेची दुसरी उमेदवारी मागे घेण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, त्या बदल्यात शिवसेना विधान परिषदेच्या तीन जागा लढवणार आहे.
काँग्रेसला विधान परिषदेची जागा निवडून येण्यास अडचण आहे. त्यामुळे शिवसेना विधान परिषदेच्या तीन जागांचा विचार करत असून, शिवसेनेच्या या नव्या प्रस्तावावर नेते संजय राऊत दिल्लीतील काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
शिवसेनेचा प्रस्ताव मंजूर झाल्यास राज्यसभेचे उमेदवार संजय पवार यांना विधान परिषदेवर सोडण्यात येणार असल्याची माहितीही मिळाली आहे.