नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण | भारत- चीन सीमेनजीक असणाऱ्या नाभिधांग नामक प्रतिबंधित क्षेत्रातमध्ये एक महिला वास्तव्यास आहे. आपण देवी पार्वतीचे रुप असल्याचे सांगत तिथून निघणार नाही. तिथेच राहील असे सांगत आहे.
कैलास पर्वतावर राहणाऱ्या भगवान शंकराशी आपण लग्न करणार असेही ती महिला म्हणत आहे. प्रशासनही त्या महिलेला त्या ठिकाणाहून बाहेर काढण्यास अपयशी होत आहे. प्राथमिक माहितीनुसार ही महिला मूळ रहिवासी लखनऊ ची असल्याचे सांगत आहे. बळजबरी केल्यास आत्महत्या करण्याची धमकी देखिल दिली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात राहणाऱ्या हरमिंदर कौर नामक या महिलेनं रितसर परवानगी घेत ती 15 दिवसांसाठी या भागात गेली होती. पण, ती तिथंच राहू लाली आणि आता हे स्थान सोडण्यास सपशेल नकार देत आहे.
उत्तर प्रदेशातील अलीगंज येथे राहणाऱ्या या महिलेनं एसडीएम धारचूला येथून 15 दिवसांची परवानगी घेत ती गुंजी इथं गेली होती. पण, 25 मे रोजी ही परवानगी संपूनही प्रतिबंधीत क्षेत्रातून परत आलीच नाही. गुंजी हे कैलास मानसरोवरच्या वाटेत येणारं एक ठिकाण. दरम्यान, अनेकांच्या म्हणण्यानुसार महिलेचे मानसिक आरोग्य कोलमडले आहे. कारण ती वारंवार आपण पार्वती असल्याचे सांगत असून इतकंच नव्हे, तर कैलासावर जाऊन शंकराशी लग्न करणार असल्याचंही ती म्हणत आहे.