पुणे राजमुद्रा दर्पण | जगभरात कोरोनाची संकट वाढताना दिसत आहे. चिंतेचा विषय बनलेला आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री मा.अजित पवार यांनी कोरोनाबाबत खबरदारी आणि काळजी घेण्याचे सांगितले आहे. रस्त्यावर कचरा टाकू नका, कोरोना अजून गेला नाही काळजी घ्या. मैदानी खेळ खेळा, व्यायाम करा. तसेच पाणी जपून वापरा आणि सकाळी लवकर उठा निर्व्यसनी राहा, असा सल्लाही दिला. कोणीही मास्क वापरण्याचे मनावर घेत नाही. हे पाहून अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.
आता परत कोरोना वाढतोय इथं पण बघा बसलेल्या भगिनींनि मास्क घातलं आहे. स्टेजवर फक्त एकाने मास्क घातला आहे, बाकी कोणीच घातला नाही. सगळे सांगतात मास्क घाला, मुख्यमंत्री म्हणतात. मी म्हणतोय,परत कोरोना येतोय ! अजून कोरोना पूर्णपणे नष्ट झाला नाही. टेस्टिंग कमी आहे,लस घ्या बुस्टर डोस घ्या,राज ठाकरे सोनिया गांधी यांना कोरोना झाला आहे. राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. त्यावेळी कोरोना झाला. कोरोना गेलेला नाही काळजी घ्यायला हवी, असे अजित पवार म्हणाले.
शारीरिक मैदानी खेळ खेळा. आरोग्याची काळजी घ्या. गेले दोन वर्षे कोरोनामुळे व्यायाम करता आला नाही. कसलाही व्यायाम कृंनचालात नाही, असे ते म्हणाले. सातारा पुणे सोलापूर जिल्हा सर्व ठिकाणी यंत्रणा काम करत असून, ज्यांना जायचे त्यांनी जावे असे आवाहन मी करतो. पण आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा, असे ते म्हणाले.