नाशिक राजमुद्रा दर्पण | भाजीपाल्याची देवाण घेवाण करण्यापासून अनेक दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्या अजूनही बेहिसाब सुरू आहे. मात्र प्लास्टिक पासून सुटका करण्यासाठी महापालिकेने मोठी कारवाई चालू केली आहे.
नाशिक महापालिकेने शहरात आजपासून कोणतेही जाडी लांबी असलेलं प्लास्टिकचा वापर , विक्री , साठवणूक करण्यास महापालिका कार्यक्षेत्रात पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आला आहे. प्लास्टिकसारख्या अविघटनशील कचऱ्यामुळे माणसांसह प्राण्यांमध्ये विविध आजार निर्माण होत आहेत. या वापराचा सार्वजनिक आरोग्यावर विपरीत होत असल्याने नाशिक शहर टास्क फोर्सने शहरात पूर्णतः प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. आयुक्त रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पूर्णतः प्लास्टिकबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे .
प्लास्टिक बंदी नियमांचे पालक न करणाऱ्याला पाच ते पंचवीस हजारांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यापूर्वी अंशतः बंदी वेळी व्यापारी विरुद्ध महापालिका संघर्ष पुन्हा एकदा वाद निर्माण झाल्याचे दिसत आहे.