जळगांव राजमुद्रा दर्पण | ई डी ने मागील गेल्या एक वर्षापासून राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्यावर कारवाई प्रक्रिया करत आहे. ही कारवाई आमच्यासाठी जरी अयोग्य असली तरी देखील केंद्र शासनाच्या ईडी विभागासाठी ही कारवाई योग्य आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा खा.रक्षा खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारला आठ वर्षे पूर्ण झाली आहे. गेल्या आठ वर्षात केंद्र सरकारने कशाप्रकारे भारताच्या विकासासाठी प्रयत्न केले. याची माहिती भाजपा खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. या पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. एकनाथराव खडसे यांच्यावरची कारवाई सुरू आहे. याबाबत आपली प्रतिक्रिया काय? असा प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर होते की, करवाई बाबत कोर्ट जो निकाल देईल तो आम्हाला मान्य असेल. कारण, आमचा कोर्टावर पूर्ण विश्वास आहे. मात्र आमच्या मते ही कारवाई चुकीची आहे. तर केंद्राच्या ईडीतर्फे ही कारवाई योग्य आहे. अशी प्रतिक्रिया रक्षा खडसे यांनी दिली