मुंबई राजमुद्रा दर्पण | औषध नियामक प्राधिकरणाने 300 औषधांची यादी करून ही यादी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे पाठवण्यात आली आहे, ज्यामध्ये QR कोड आहे. या औषधांमध्ये पेन रिलीफ, व्हिटॅमिन सप्लिमेंट्स, रक्तदाबासाठी औषधे, साखर आणि गर्भनिरोधक यांचा समावेश आहे.
या नियमामुळे औषधांच्या विक्रीत आणि किमतीत स्पष्टता येईल आणि औषदांचा काळाबाजार कमी होईल. जेणेकरून नागरिकांना औषद काही डी करतांना ते औषध बनावट तर नाही ना याची खात्री घेता येईल.नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने डोलो, सॅरिडॉन, फॅबिफ्लू, इकोस्प्रिन, लिम्सी, सुमो, कॅल्पोल, कोरेक्स सिरप आणि अनवॉन्टेड 72 आणि थायरोनॉर्म सारख्या मोठ्या ब्रँडचा समावेश आहे. ही सर्व औषधे खूप पॉप्युलर असून आणि ती ताप, डोकेदुखी, विषाणूजन्य, जीवनसत्वाची कमतरता, खोकला, थायरॉईड आणि गर्भनिरोधकांसाठी दिली जातात.
मार्केट शोधा नुसार, त्यांच्या वर्षभरातील उलाढालीच्या आधारावर या औषधांची निवड करण्यात आली आहे. या औषधांची यादी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला पाठवण्यात आली. ज्यामुळे त्यांना QR कोड अंतर्गत औषधे आणण्यासाठी आवश्यक तरतुदी आणि सुधारणा करता येतील.