जळगाव, दि. ३ (प्रतिनिधी) : वाढदिवस हा विविध समाज उपयोगी कामांसाठी संधी असून या अनुषंगाने डॉ. कमलाकर पाटील यांनी आयोजीत केलेले रक्तदान आणि अन्य उपक्रम हे अतिशय कौतुकास्पद असेच आहेत. गोरगरिबांच्या सेवेमुळे आयुष्यात कधीही कमतरता पडत नसून हेच काम प्रत्येकाने करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते फुफणीचे माजी सरपंच डॉ. कमलाकर पाटील आणि माजी पंचायत समिती सभापती शीतलताई पाटील यांनी आयोजीत केलेल्या रक्तदान आणि अन्य समाजउपयोगी उपक्रमांच्या कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करून त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त फुफणीचे माजी आदर्श सरपंच डॉ. कमलाकर पाटील यांच्यातर्फे शहरातील दूध फेडरेशन जवळ रक्तदान, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच विविध लाभार्थ्यांना कार्ड वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे ढोल-ताशांच्या गजरात आणि अतिशय चैतन्यदायी वातावरणात स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे युवासेनेचे विस्तारक कुणाल दराडे, विधानसभा संपर्क प्रमुख अरविंदजी नाईक, म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, बाजार समिती सभापती कैलास चौधरी, उपजिल्हा संघटक नरेंद्र सोनवणे, तालुका संघटक मुकेश सोनवणे, उपतालुका प्रमुख धोंडू जगताप, प्रमोद सोनवणे, योजेश लाठी, युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी शिवराज पाटील, जि.प. सदस्य पवन सोनवणे, भरत बोरसे, जनाआप्पा कोळी, तुषार महाजन, रवींद्र चव्हाण सर, कैलास चौधरी, मुरलीधर पाटील, विकास पाटील, रामचंद्रबापू पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यानंतर उपस्थितांतर्फे पालकमंत्र्यांचा सत्कार करून आणि केक कापून त्यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टीचिंतन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कमलाकर पाटील यांनी केले. ते म्हणाले की, ना. गुलाबरावरजी पाटील यांच्या माध्यमातून जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातल्या ग्रामीण भागात विकासकामे मोठ्या प्रमाणात सुरू असून आगामी काळातही अशीच कामे होतील अशी ग्रामस्थांनी खात्री असून याचमुळे सर्व जनता भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, वाढदिवस हा विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यासाठी एक चांगली संधी असते. याचा विचार करता डॉ. कमलाकर पाटील आणि शीतलताई पाटील यांनी आज रक्तदानासह अन्य समाज उपयोगी उपक्रमांचे आयोजन केल्याची बाब ही अतिशय कौतुकास्पद अशीच आहे. गोरगरिबांच्या सेवेमुळे आयुष्यात कधीही कमतरता भासत नाही. यामुळे कुणीही सातत्याने समाज हिताचाच ध्यास घ्यावा. रक्तदान शिबिरासह वंचित घटकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न देखील कौतुकास्पद असेच आहेत. हे काम अविरतपणे सुरू ठेवण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी याप्रसंगी केले.
या कार्यक्रमाला परिसरातील सरपंच, उपसरपंच, विकासो संचालक, युवासेना, शिवसेना पदाधिारी, ज्येष्ठ नागरिक व महिलांची उपस्थिती होती. संदीप पाटील यांनी अतिशय बहारदार अशा पध्दतीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर आभार डॉ. कमलाकर पाटील यांनी मानले.