जळगाव, दि. ४ ( प्रतिनिधी ) : ज्या ठिकाणी ज्ञानदानाचे कार्य होते तिथे सौर उर्जा प्रकल्पाचा शुभारंभ करतांना खरेखुरे आत्मीक समाधान मिळत आहे. विद्यापीठातील विविध कामांसाठी निधीला कोणत्याही प्रकारे कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली. विद्यापीठातील मुलांच्या आणि मुलींच्या प्रत्येकी २०० इतकी क्षमता असणार्या दोन वसतीगृहांसाठी ४२ कोटी रूपयांच्या निधीसाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. पालकमंत्र्यांच्या हस्ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील ६५० मेगावॅट क्षमतेच्या सौर उर्जा प्रकल्पाच्या कामास आज प्रारंभ करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. दरम्यान, या उर्जा प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून ३ कोटी ७५ लक्ष रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून यामुळे विद्यापीठाच्या वीज बिलात मोठी बचत होणार आहे.
पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ६५० मेगावॅट क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. या माध्यमातून विद्यापीठाच्या वीज बिलात मोठी कपात होणार असून यातून पर्यावरणाचे संवर्धन देखील होणार आहे. हा प्रकल्प कॅपेक्स मोडवरील असून तो पारेषणाशी संलग्न असणारा आहे. या प्रकल्पाच्या उभारणीचा शुभारंभ आज सकाळी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, प्र कुलगुरू डॉ. इंगळे, प्रभारी कुलसचिव डॉ. किशोर पवार आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक . . . यांनी केले. त्यांनी आपल्या मनोगतातून सौर उर्जा प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली. कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांनी सौर उर्जा प्रकल्पामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे वीज बिल दोन तृतीयांशने कमी होणार आहेत. अर्थात, आता विद्यापीठाला फक्त एक तृतीयांश इतके वीज बिल येणार आहेत. विद्यापीठातील सौर उर्जा प्रकल्पासाठी अवघ्या दोन महिन्यात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून तात्काळ निधी उपलब्ध करून दिल्याने हे काम तात्काळ मार्गी लाल्याचे ते म्हणाले. दरम्यान, अतिशय संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणजेच ना. गुलाबराव पाटील होत अशा शब्दांमध्ये त्यांनी पालकमंत्र्यांचे कौतुक केले. तर आगामी काळात विद्यापीठाच्या विविध प्रकल्पांसाठी ना. पाटील यांनी असेच सहकार्य करावे असे आवाहन केले.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आपल्या मनोगतात म्हणाले की, जिथे विद्यादानाचे काम होते, तिथे सौर उर्जा प्रकल्पाचे उदघाटन करतांना आत्मीक समाधान लाभत आहे. विद्यापीठाने आजवरच्या वाटचालीत खान्देशातल्या तिन्ही जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना अव्याहतपणे ज्ञानदानाचे काम केले आहे. ज्याप्रमाणे जीआर वरून शासनाचे काम समजत असते, अगदी त्याच प्रमाणे जनतेच्या सीआरवरून लोकप्रतिनिधीचे मूल्यमापन होत असते. आपण सीआर चांगला रहावा यासाठी अविरतपणे प्रयत्न करत अहोेत. विद्यापीठात विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांच्यासाठी प्रत्येकी २०० इतकी क्षमता असणार्या वसतीगृहांच्या कामासाठी एकूण ४२ कोटी रूपयांचा निधी मिळावा यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. लवकरच या कामांना मान्यता मिळेले असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तर शाश्वत विजेसाठी सौर उर्जा हे अतिशय महत्वाचा पर्याय असून याला प्राधान्य देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. लवकरच राज्यातील ८०० गावांच्या पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर शिफ्ट करण्यात येणार असल्याची माहिती देखील पालकमंत्र्यांनी दिली.