मुंबई राजमुद्रा दर्पण | विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते आहे. फडणवीसांनी स्वतःच्या ट्विटर अकाऊंट वरून माहिती दिली आहे. कोरोनाची लागण दुसऱ्यांदा झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर दौरा आयोजित करण्यात आला होता. परंतु दौरा रद्द करण्यात आला. हा दौरा रद्द झाल्यामुळे. फडणवीस मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. त्यांनी सोलापूर दौरा अचानक का रद्द का केला. याची सर्वत्र चर्चा होती. आज त्यांनी ट्विट करत कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले.जे लोक माझ्या संपर्कात आले आहे त्यांनी काळजीपूर्वक स्वतःची कोरोना चाचणी करुन घ्यावी. सर्वांनी आपापली काळजी घ्यावी, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. फडणवीस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सगळी औषधे नियमित घेत असून ते सध्या घरीच आयसोलेशनमध्ये आहेत. त्याआधी लॉकडाऊनच्या काळात फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली होती.