जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव जिल्ह्यात येत्या आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते अशी शक्यता कोरोना डॉक्टरांकडून वर्तवली जात आहे .
जळगाव जिल्ह्यातील लोकांनी कोरोना च्या भयंकर दोन लाटां सहन केल्या आहे. तरी देखील जळगावातील नागरिक कोरोना बाबत निष्काळजी पणा दाखवत आहेत. पण आता मात्र आता जिल्ह्यांतील नागरिकांनी कोरोना पासून स्वतःची सुरक्षा करणे अत्यंत गरजेचे झाले आहे कारण तसे न केल्यास लवकरच संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे .
जळगाव जिल्ह्यातील अजूनही बऱ्याच नागरिकांनी (vaccine) कोरोना लस घेतलेली नाहीये, त्यामुळे अशा नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करून घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे. कारण जिल्ह्यातील नागरिकांना कोरोणा पासून वाचवण्याचे फक्त एकच साधन आहे आणि ते म्हणजे कोरोना लस (Vaccine) त्याचसोबत जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी आता कोरोना नियंमनचे पालन करणेही गरजेचे झाले आहे.
जळगाव जिल्ह्यात या वेळी चार कोरोना ॲक्टिव्ह केसेस आहेत. आणि गेल्या महिनाभरात जिल्ह्यात एकही कोरोना रुग्णाची नोंद करण्यात आलेली नव्हती, पण आता मात्र करण्यात आलेली आहे.अचानक चार रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये चार पैकी तीन रुग्ण चोपडा तालुका मध्ये ते एकाच कुटुंबातले आहेत आणि एक रुग्ण हा जळगाव शहरातलाच आहे. येणार कोरोना काळ लक्षात घेता त्या संदर्भात पोलिस तसेच महापालिकेत कारवाई मोहीम करण्यात येणार आहे.
नागरिकांनी अश्या पद्धतीने काळजी घ्यावी :-
-नियमित मास्क वापरने
-वारंवार हात धुणे
-सॅनिटाईझर चा वापर करणे
-एकमेकांशी बोलताना 2 गज चे अंतर ठेवून संभाषण करने
-जमावबंदी च्या नियमांचे पालन करणे