जळगांव राजमुद्रा दर्पण | रशिया-युक्रेन मध्ये झालेल्या युद्धाची झळ पूर्व युरोप आणि इतरही देशांना बसली आहे. यात भारताचाही समावेश आहे. या युद्धामुळे पोटॅशच्या ५० किलोच्या गोनीचे दर गेल्या चार महिन्यांत ७०० रुपयांनी वाढले असून पूर्वी १ हजाराला मिळणारी गोनी आता १७०० रुपयांना विक्री होत आहे..
सगळ्याच कंपन्यांच्या खतांच्या दर वाढल्याचं दिसून येत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे गत तीन महिन्यांत पोटॅशचे दर १ हजार रुपयांवरून १७०० रुपयांवर पोहोचले आहेत. पोटॅश दरवाढीमुळे मिश्रखतांच्या किमतीही १०० ते २५० रुपयांनी वाढल्या. दुसरीकडे डीएपी खताचे दरही १०० रुपयांनी महागले आहे.
पिकाच्या वाढीसाठी वापरल्या जाणाऱ्या पोटॅशचे दर 7000 रुपयांनी वाढल्यामुळे शेतकऱ्यावर बोजा वाढला आहे. मान्सूनचे केरळात आगमन झाल्यानंतर पुढच्या काही दिवसांत महाराष्ट्रात दाखल होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग पावसाकडे डोळे लावून बसला आहे. पाऊस पडताच शेतकऱ्यांची खतांच्या खरेदीसाठी लगबग सुरू होते.यंदा मात्र खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे.