जळगांव राजमुद्रा दर्पण | टोळी दरोड्याच्या प्रयत्नात होती तेवढ्यात पोलिसांनी अटक केली. दरोडेखोरांकडून ३ गावठी पिस्तुलसह १७ काडतूस असे एकूण ७ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे
रवींद्र वसंत खोर्गे (वय २४), जिजाबा फाळके ( वय ३९), चांदपाशा शेख ( वय ३२), जयेश भुरूक (वय २४ ) असे अटक करण्यात आलेल्या चार आरोपीचे नाव आहे. तर सतनामसिंग जुनैजा हा पाचवा आरोपी पसार झाला आहे. दि. ४ रोजी चोपडा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील लासुर ते सत्रासने रोडवरील उत्तमनगर गावाच्या अलीकडे असलेल्या घाटात सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास धाक दाखवून दहशत माजवून दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असताना सदर आरोपी आढळून आले.
पसार आरोपी सतनामसिंग जुनैजा याला पकडण्याचा प्रयत्न केला तर त्याने फिर्यादीच्या छातीवर वार करून ” तेरे मे धम हैं तो मुझे पकड के दिखा” असे बोलून शासकीय कामत अडथळा निर्माण केला. पसार आरोपीने अटकेतील आरोपींना दरोडा टाकण्याच्या उद्देशाने प्राणघातक शस्त्रे विक्री केली होती. व दरोडा टाकण्यासाठी मदत केल्या प्रकरणी पो. हे. को.मनोज अशोक दुसाने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोपडा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे करीत आहेत.