मुंबई राजमुद्रा दर्पण | जवळपास महिन्याभरापासून राज्यात कोरणारुग्ण संख्येत वाढ होत आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन आणि राज्य सरकार लक्ष देऊ लागली आहे. मुंबई पालिकेने टेस्टिंग वाढवण्यासह मालाडमधील कोव्हिड सेंटर सुरु करण्याचे आदेश दिले.
राज्य सरकारची उद्या सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार असून बैठकीत कोरोना नियमावलीबाबत चर्चा होणार आहे. आतापर्यंत कोरोनामध्ये आपल्या सर्वांनाच मनाविरुद्ध या सर्व निर्बंधांचं पालण करावं लागलं. मात्र पुन्हा तशा परिस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासन सतर्क झाली आहे.
सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दररोज वाढणारी कोरोना रुग्णसंख्या आणि नियमावली यावर चर्चा होणार असल्याचे समजते. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय घेतला जातोय, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मुंबईत कोरोना रुग्ण वाढल्यास मास्कची सक्ती अटळ असल्याचे संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत. कोरोना नियम न पाळल्यास कठोर निर्बंध लागतील, असाही इशारा अस्लम शेख यांनी दिलाय. तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मास्क घालण्याचं आवाहन केलंय.