जळगाव-जागतिक पर्यावरण दिन निमित्ताने सुबोनियो पक्षीघर परिसरात डॉ डी जी बेंडाळे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ गौरी राणे, अँड मंगला ठोंबरे- निवृत्त जॉईंट सेक्रेटरी लॉ अँड ज्यूडीशरी विभाग,मंत्रालय-मुंबई
प्रसिद्ध उद्योजक व सुबोनियो केमिकल्स चे संचालक सूबोध कुमार चौधरी, उद्योजक सुमोल चौधरी या मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकारची फळझाडे लावून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
जांभूळ, बदाम,चिंच,उंबर,पेरू अशी पूर्ण देशी झाडं पक्षीघर परिसरात लावण्यात आली.झाडं मोठी झाल्यावर येणाऱ्या पक्षांना फळांचा आस्वाद घेता यावी अशी संकल्पना राबविण्यात येत आहे.
दरम्यान मेहरून तलावाच्या काठावर जळगांव महानगरपालिका,सुबोनियो केमिकल्स लिमिटेड, जळगांव व मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त सहकार्याने मेहरून तलाव परिसरात सत्तर फूट उंच सुबोनियो पक्षी घर साकारण्यात आले.लवकरच पक्षी घर लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.
वृक्षारोपण प्रसंगी सौ हिरा सूबोध कुमार चौधरी,सौ सारिका सुनील चौधरी, सौ अपर्णा सुयोग चौधरी मराठी प्रतिष्ठान चे अध्यक्ष ऍड जमील देशपांडे, सचिव विजय वाणी,सौ निलोफर देशपांडे,डॉ सविता नंदनवार,यांच्यासह मतीन पटेल, संदीप मांडोळे, फिरोज भाई,दिपक धांडे,किरण पांडे उपस्थित होते..