गेल्या दोन वर्षाच्या दीर्घ काळानंतर महाराष्ट्रात मास्क पासून मुक्ती मिळाली होती.पण गेल्या काही दिवसापासून राज्यात कोरोना चे थैमान माजत आहे, कोरोना बाधितांची संख्यामध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. ही पार्श्वभूमीवर लक्षात घेता राज्यात पुन्हा एकदा मास्क सक्ती करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं बंधनकारक करणे याबाबत आरोग्य सचिव यांच्याकडून प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहे.
कोणकोणत्या ठिकाणी मास्क बंधनकारक ? :-
संपूर्ण राज्यात मागील दोन महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. मागच्या दोन महिन्यात करोना रुग्णसंख्या कमीतकमी 100 चा टप्पा पार करत होती. पण गेल्या काही दिवसापासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. वाढत्या कोरोना बाधित रुग्ण संख्येची पार्श्वभूमीवर लक्षात घेता 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड टास्क फोर्स सोबत बैठक घेऊन आढावा घेतला होता. यादरम्यान, आता अनेक ठिकाणी पुन्हा मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
आरोग्य सचिव यांनी कोरोना पार्श्वभूमीवर मास्क सक्ती या संदर्भात पत्रातून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.रेल्वे,बस,सिनेमा गृह,शाळा कॉलेज,ऑफिस,बैठक हॉल,हॉस्पिटल इत्यादी ठिकाणी मास्क सक्ती करण्यात आली आहे. त्याचसोबत आरोग्य सचिव यांनी सर्व आयुक्तांना व जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून कोरोना चे नियमावली लागू करण्याबाबत निर्देश दिले आहेत.