रायगड : रायगडावर आज 6 जून शिवराज्याभिषेक सोहळा नेहमी प्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिषेक घातला. त्याप्रसंगी मोठमोठ्या संख्येनं शिवप्रेमी व शिवभक्त रायगडावर एकत्रित झाले होते. सोहळ्या मध्ये बोलताना छत्रपती संभाजीराजे यांनी मागील गेल्या काही दिवसापासून राज्यात सुरु असलेल्या राजकारणाविषयी बोलणं केलं. राज्यसभा निवडणुकीसाठी संभाजीराजे हे अपक्ष उमेदवार म्हणून होते. मात्र शिवसेनेने दुसरा उमेदवार उभा केल्यानं संभाजीराजे यांची कोंडी निर्माण झाली. त्यामुळे त्यांना राज्यसभा निवडणुकीतून माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे आज संभाजीराजे रायगडावरुन काय भाष्य करतील याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं.संभाजीराजे यांनी आज रायगडावरुन अप्रत्यक्षरित्या शिवसेना आणि महाविकास आघाडीला जोरदार निशाणा साधला.
छत्रपती संभाजीराचे म्हणाले की, गेल्या दोन वर्षात शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणानं साजरा करावा लागला. तेव्हा मी रायगडावर येऊ नका असे सांगितले होते आणि तुम्ही माझा हा शब्द पाळला हा छत्रपतींबद्दलचा विश्वास व प्रेम आहे. इथे कशाची ही सोय नाहीये, मात्र तरीही तुम्ही इथे हजर असता. माझा प्रश्न हा सरकारला आहे की शिवभक्तांसाठी तुम्ही काय केलं ? एसटी आम्हीच आणायची, पाणी आम्हीच आणायचं. जर सरकार कडून काही सोय होत नसेल तर हा लढ्याची सुरुवात इथूनच होईल. मग होऊन जाऊ द्या, असा इशाराच छत्रपती संभाजीराजे यांनी दिलाय.
ब्रिटनच्या पाहुण्यालाही शिवाजी महाराजांसमोर झुकाव लागला :-
आपण इथे कशासाठी आलो आहोत, जल्लोष करण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांना जाऊन 100 वर्षे झाली. ते सामाज सुधारक होतेच, त्या सोबतच छत्रपतीं शिवाजी महाराजांचे नववे वंशज ही होते. त्यांनी अनेक ठिकाणी छत्रपतींचे स्मारक उभे केले होते. पुण्या मध्ये जर कुणी शिवाजी महाराजांचं स्मारक उभं केलं असेल तर ते फक्त शाहू महाराजांनी, शाहू महाराजांनी ब्रिटनच्या पाहुण्यालाही शिवाजी महाराजांसमोर झुकवल होत. मी किल्ल्याचं जतन व संवर्धन सुरु केलंय. राष्ट्रपतींना सुद्धा शिवाजी महाराजांसमोर आणलं, असे संभाजीराजे म्हणाले.
‘जिथे आपल्यावर बंधनं घातली जातात, तिथे थांबायचं नसतं’ :-
मी राजकीय बोलणार नाही. राज्यात अनेक महत्त्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. आरक्षण, पाणी, शेतकरी यासारखे अनेक प्रश्न आहेत, हा संभाजी छत्रपती लवकरच राज्यात सर्वांना भेटायला येणार आहे. राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी शिवाजी महाराज छत्रपती झाले होते. देशाचा पहिला स्वातंत्र्यदिन त्याच दिवशी ज्या दिवशी राज्याभिषेक झाला. महाराजांच्या इतिहासापासून आपल्याला काय घ्यायचं हे आधी ठरवायला हवं. त्यांनी प्रस्थापितांऐवजी विस्थापितांना संधी दिली होती.तिकडे शिवाजी महाराजांविरोधात अनेक शाही उभ्या होत्या. त्यांना अडवण्यासाठी बाप-लेकात भांडणं लावली गेली. शहाजीराजेंवर मोठा दबाव होता तेव्हा घराण्यात फूट पाडण्यासाठी अनेकजण पुढे आले होते. शहाजींना पत्र लिहिलं गेलं होतं की शिवाजी महाराजांना थांबवा नाही तर आपल्यात शामिल करुन घ्या. पण शहाजीराजेंनी शिवाजी महाराजांना पून्हा स्वराज्य उभं करण्यासाठी रान उघडं करुन दिलं. शहाजीराजेंच्या मदतीनं शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याचा पाया उभारणी केली. हे सगळं करत असताना शिवाजी महाराजांनी कुठेही तडजोड केली नाही. या पिता पुत्रांचं मला सांगायचं आहे. जी शिकवण मला दिली आहे ती तुम्हालाही दिली जात आहे. त्यामुळे झुकायच नाही. पुरंदरचा तह अपमानकारक होता, त्यांना आग्र्याला जावं लागलं होत. मात्र त्यांनी तो तह धुडकावून लावला.
जिथं बंधने घातली जातात तिथं थांबायचं नसत, शिवाजी महाराजांनी परक्यांशी संघर्ष केलाच पण त्यासोबतच स्वकीयांशीही लढले.आपल्याला पुन्हा एकदा शिवाजी महाराजांचा स्वराज्य उभं करायचं आहे अशा शब्दात छत्रपती संभाजीराजे यांनी आपल भाष्य करून आगामी दिशा स्पष्ट केली