बारावी परीक्षेचा निकाल हा उद्या म्हणजेच बुधवारी (८ जून ) दुपारी १ वाजता जाहीर केला जाईल. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या परिक्षेचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात लागेल हे आधीच स्पष्ट करण्यात आले होते. अखेर उद्या म्हणजेच ८ जून बुधवार रोजी निकाल जाहीर केला जाईल, असा स्पष्ट करण्यात आले आहेत ,यावेळी निकालाची संपूर्ण तयारी झाली असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री शरद गोसावी यांनी दिली. संपूर्ण राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा ह्या निकालावर लक्ष लागून होत. विद्यार्थ्यांना सुद्धा बारावीच्या निकालाबद्दल उत्कंठा वाढली होती. अखेर हा दिवस आला आहे .
यावेळी निकाल खास असेल :-
यावेळी बारावीचा निकाल हा खास असणार आहे कारण 2 वर्ष कोरोना महामारी त्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ह्या ऑनलाईन आणि आता निकाल ही ऑनलाईन. पण ह्या वेळी बारावीच्या परीक्षा ह्या ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या.पेपर तपसण्यावर बहिष्कार घाला अश्या प्रकारचे बऱ्याच अडचणी येत होत्या मात्र आता निकालाची तारीख जाहीर झाली व विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.