जळगाव राजमुद्रा दर्पण : आता पर्यत राज्यपालांच्या यादीतून विधान परिषदेच्या आमदारकी करिता नाव वगळण्यात आले नाही, त्यामुळे अजून देखील राष्ट्रवादीच्या कोट्यातील आमदारकीची शक्यता कमी असून पक्षाने संधी दिल्यास आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी दिली आहे. राज्यात महा विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून कोणत्या कोणत्या चौकशीचा ससेमिरा सरकारच्या मागे लागू नये यातच राष्ट्रवादीत दाखल झालेले फायरब्रँड नेते एकनाथराव खडसे यांचा पुनर्वसनाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सकाळपासून राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना राष्ट्रवादीच्या रिक्त झालेल्या कोट्यातून विधान परिषदेवर संधी दिली जाणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाल्या, त्यामुळे संपूर्ण जळगाव जिल्हा तसेच महाराष्ट्रभरात खडसे यांना विधान परिषदेवर संधी मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत खडसे यांच्याशी राजमुद्रा च्या माध्यमातून संवाद साधला असता त्यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधानपरिषदेवर जाणार याबाबत शक्यता कमी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मात्र जळगाव जिल्ह्यातील विधान परिषदेची निवडणूक येत्या तीन ते चार महिन्यात होण्याची शक्यता आहे भाजपाचे चंदू पटेल या जागेवर निवडून आले आहेत त्यांचा कार्यकाळ काही दिवसात संपुष्टात येणार आहेत या जागेबाबत बोलताना खडसे यांनी विधानपरिषद लढवण्यात येईल असे देखील सूतोवाच खडसे यांनी केले आहे.
कारण राज्यपालांकडे महाविकासआघाडी कडून राज्यपाल नियुक्ती आमदारांसाठी जो प्रस्ताव पाठविण्यात आला आहे त्यामध्ये अद्याप पर्यंत खडसे यांचे नाव कायम आहे. ते अद्याप वगळण्यात आले नाही त्यामुळे राज्यपालांच्या यादीतून नाव व घडल्याशिवाय राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषदेवर जाण्याची शक्यता कमी असल्याचे एकनाथराव खडसे यांनी राजमुद्रा शी बोलताना सांगितले आहे.
भोसरी येथील वादग्रस्त लोखंडा बाबत खडसे यांना ईडी च्या न्यायालयाकडून तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला आहे. एवढेच नाही तर गेल्या पाच दिवसांपूर्वीच खडसे यांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश ईडी कडून करण्यात आले आहेत. असे असताना एकनाथराव खडसे यांचे राष्ट्रवादीच्या कोट्यातील रिक्त जागेवर विधान परिषदे वर वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र याबाबत अधिकृतरीत्या राष्ट्रवादीच्या एकाही नेत्यांने जाहीर रित्या प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.
शिवसेनेच्या विधान परिषदेच्या रिक्त कोट्यातील दोन जागांवर मुंबईतील शिवसेना नेते सचिन अहिर यांची व नंदुरबार चे शिवसेना जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. याबाबत अधिकृत दुजोरा मातोश्रीवरून देण्यात आला आहे. मात्र राष्ट्रवादीकडून कोणाला संधी देण्यात येते याबाबत अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.