विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे, त्यामुळे कोणता पक्ष कोणाला उमेदवारी चे तिकीट देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे, शिवसेनेचे सचिन अहिर आणि नंदुरबार चे आमशा पाडवी यांना तिकीट मिळणार अशी बातमी समोर आली आहे. खासदार संजय राऊत यांनी याबाबतची माहिती देताना सांगितले की, “ही बातमी अधिकृतपणे लवकरच जाहीर केली जाईल”
शिवसेनेकडून नंदुरबारचे आमशा पाडवी व सचिन अहिर यांना विधानपरिषदेच तिकीट देण्याचे ठरवले आहे, खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात माहिती दिली ते म्हणाले की, “आमशा पाडवी व सचिन अहिर यांच्या नावाची आधीपासूनच चर्चा होती त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संमती दिली. व अधिकृतपणे लवकरच ही उमेदवारी जाहीर केली जाईल”,
आमशा पाडवी कोण आहेत ?
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव-अक्कलकुवा येथील कट्टर शिवसैनिक आमशा पाडवी यांना शिवसेनेने विधानपरिषदेचे तिकीट जाहीर केले आहे. धडगाव-अक्कलकुवा या मतदारसंघातून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती पण कॉंग्रेस नेते केसी पाडवी यांनी त्यांचा 2096 मतांनी पराभव केला होता. आज त्यांना शिवसेनेने विधानसभेसाठी तिकीट दिले आहे.
सध्या राज्याच्या राजकारणात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राज्यसभा निवडणुकीचे रंग चढताना दिसत आहेत. याकाळात आता विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी या दोघांच्या नावाची घोषणा केली अशी माहिती समोर आली आहे. शिवसेना सध्या मोठ्या मोठ्या चेहऱ्यांऐवजी कट्टर आणि स्थानिक नेत्यांना उमेदवारी देत असल्याचं दिसून येत आहे. त्यात राज्यसभेसाठी संजय पवार आणि विधानपरिषदेसाठी आता आमशा पाडवी यांना निवडणुकीचे तिकीट देण्याची माहिती मिळाली आहे.
आमशा पाडवी यांनी सांगितले की “मला खासदार संजय राऊत यांचा कॉल आला होता, त्यांनी आदित्य ठाकरे व अनिल देसाई यांनीही मला याबद्दल सांगितलं होत, की विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आम्ही तुमचं नाव घेतलं आहे. नंदुरबार सारख्या दुर्गम भागात मी काम केलं आहे व पक्ष वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न ही केले आहे. त्याचं माझ्या या कामावर विश्वास ठेवून आमच्या पक्षप्रमुखांनी माझ्यावर ही मोठी जबाबदारी दिली आहे. मला याचा आनंदच आहे. आणि मी इथून पुढेही असंच चांगलं काम करत राहिल”