जे बँक भरतीची तयारी करत आहेत आणि बँकेत नोकरी करण्यास इच्छुक आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. IDBI बँकेने अनेक राज्य आणि शहरांमध्ये असलेल्या त्यांच्या विविध शाखांमध्ये व्यवस्थापक आणि कार्यकारी पदांसाठी जागा जाहीर केल्या आहेत. ३१ मे २०२२ म्हणजेच मंगळवारी बँकेने जारी केलेल्या भरती मध्ये कार्यकारी पदासाठी एकूण १,०४४ जागा आणि ग्रेड-ए व्यवस्थापक च्या ५०० जागा भरतीसाठी पात्र असलेले उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पण अर्जदारांनी एक गोष्ट ध्यानातं घेतली पाहिजे की कार्यकारी पदांची भरती IDBI बँकेद्वारे कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे.
IDBI बँक भर्ती अर्जाची प्रक्रिया :-
आयडीबीआय बँकेतील व्यवस्थापक व कार्यकारी या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी बँकेची अधिकृत वेबसाइट idbibank.in वर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ही ३ जून २०२२ शुक्रवार पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जून २०२२ पर्यंत असेल. उमेदवारांना शेवटच्या तारखेपर्यंत १००० रुपये इतके अर्ज शुल्क भरावे लागेल.
SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क फक्त २०० रुपये आहेत.
IDBI बँक भरती पात्रता निकष :-
IDBI ने जारी केलेल्या व्यवस्थापक व कार्यकारी भरती साठी जे उमेदवार पदांसाठी बँकेने नमूद केलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करतील, अश्याच उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातील .
असिस्टंट मॅनेजर व एक्झिक्युटिव्ह पदांसाठी, उमेदवारांनी मान्यता मिळालेल्या विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेच्या शाखेतून पदवी उत्तीर्ण केलेली असावी. कार्यकारी पदांसाठी उमेदवाराचे वय १ एप्रिल २०२२ रोजी २० ते २५ वर्षांपेक्षा कमी असावे आणि असिस्टंट मॅनेजर पदासाठी २१ ते २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. या पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी भरतीचे अधिसूचना पाहा.